देशात २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत ५५ हजारांहून अधिकची वाढ

0

नवी दिल्ली : देशात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून देशात मागील २४ तासांत देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. देशात मागील २४ तासांत ५५ हजार ७९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे १६ लाख ३८ हजार ८७१ एवढी देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर आतापर्यंत १० लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी यशस्वीरित्या मात केली आहे. तर देशभरात सध्या ५ लाख ४५ हजार ३१८ जणांवर उपचार सुरु आहेत. पण याच दरम्यान एक चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण कोरोनाबळी ३५ हजार ७४७ झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 31-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here