मुंबई : आंबेनळी घाटात एक वर्षापूर्वी झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉ. बाळासहेब सावंत कोकण विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी घेतला. गेल्यावर्षी जुलैमध्ये कोकण विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बसचा आंबेनळी घाटात अपघात झाला होता. त्यात मृत्यूमुखी पडलेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत मागणी होती. त्यानुसार कृषी, वित्त, सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करून १९ जणांना गट क आणि ड संवर्गात नियुक्तीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला. त्याची प्रत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत यांना कृषिमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.
