रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथे विजवाहिनीच्या खांबाजवळून घरातील कनेक्शनसाठी लागणाऱ्या वाहिनीचे माप घेण्यासाठी लोखंडी रॉडचा मुख्य वाहिनील स्पर्श होऊन विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.४५ वा.सुमारास घडली. महिपत रामचंद्र तांबे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी महिपत हे माप घेत होता. त्यासाठी त्याने लोखंडी रॉडचा वापर केला होता. माप घेत असताना त्याच्या हातातील रॉडचा मुख्य वाहिनीला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
