‘लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये असलेले महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही’

0

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचं दाखवलं जातं. पण खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. एकमेकांशी सुसंवाद नसलेलं हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचं सरकार कधीच चालेलं नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणो काँग्रेसनेही असं सरकार कधीच चालू दिलेलं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असंही फडणवीस म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 31-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here