साखरपा येथे आज शिवभोजन थाळीचा प्रारंभ

0

संगमेश्वर : साखरपा येथे आज शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. साखरपा येथे अनेक वर्षे भोजनाची यशस्वी व्यवस्था करणाऱ्या माने बंधूंच्या हॉटेल एव्हरेस्ट येथे राज्य शासनाच्या शिवभोजन थाळी योजनेला सुरुवात झाली. साखरपा परिसरातील अनेक गरजूंना या शिवभोजन योजनेचा लाभ होईल, असे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी सांगितले. ही योजना दररोज सकाळी ११ ते ३ या ळेत कार्यरत राहणार आहे. कोरोना काळात या थाळीचा दर पाच रुपये असणार आहे. त्यामध्ये भाजी, चपाती, वरणभाताचा समावेश असेल. ही योजना साखरपा परिसरात सुरू करण्यासाठी पंचायत समिती सदस्य जया माने यांनी विशेष मेहनत घेतली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:17 PM 31-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here