मलिंगाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय

0

श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज आणि यॉर्करचा बादशाह लसिथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्ध पहिला वन डे सामना खेळून मलिंगा आंतरराष्ट्रीय अलविदा म्हणणार आहे. मलिंगाने २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

मलिंगाच्या निवृत्तीबाबत श्रीलंकेचा कर्णधार करुणारत्ने म्हणाले, “माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा वन डे सामना खेळणार आहे. त्यानंतर तो वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. मलिंगाने निवड समितीला नेमके काय सांगितले हे माहित नाही, पण त्याने मला आपला बांगलादेशविरुद्ध शेवटचा वन डे असल्याचे कळवले आहे.

लसिथ मलिंगाने २२५ वन डेमध्ये ३३५ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये मुथय्या मुरलीधरन ५३४ आणि चमिंडा वास ४०० यांच्यानंतर मलिंगाचा नंबर लागतो. मलिंगाने २०११ मध्येच कसोटीतून निवृत्ती घेतली होती. २०१० मध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मलिंगाने कारकिर्दीत ३० कसोटी सामन्यात १०१ विकेट्स घेतल्या आहेत. तर ७३ टी 20 सामन्यात त्याच्या नावावर ९७ विकेट्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here