तिवरेवासियांसाठी सिध्दीविनायक नगरी उभारणार, खासदार विनायक राऊत यांची घोषणा

0

रत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांना सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून धरणग्रस्तांना घरे बांधून दिली जाणार आहेत. 11 कोटींचा हा प्रस्तावित प्रकल्प असून या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित रहातील असे सांगतानाच या नगरीला ‘सिद्धिविनायक नगरी’ असे नाव दिले जाईल, असेही खा. विनायक राऊत यांनी रविवारी चिपळूण येथे सांगितले. ते तिवरे गावठाण नळपाणी योजनेच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. तिवरे धरण दुर्घटनेमध्ये पाण्याच्या प्रवाहाने उद्ध्वस्त झालेल्या तिवरे गावठाण नळपाणी योजना अतिवृष्टी कार्यक्रम 2019-20 अंतर्गत योजनेचा उद्घाटन समारंभ खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, तालुकाप्रमुख संदिप सावंत, सभापती धनश्री शिंदे, माजी बांधकाम सभापती व विद्यमान जि.प.सदस्य विनोद झगडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्या दिप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, तिवरे सरपंच वैशाली पाचांगणे, तिवरे ग्रामविकास समिती कमिटी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास व सनियंत्रण समिती सदस्य मंगेश शिंदे उपस्थित होते

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 03-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here