अंजनवेल मधील तरुणाने घेतले पेटवून

0

गुहागर : गुहागर तालुक्यातील अंजनवेलमधील तरुणाने लग्न होत नसल्याच्या कारणातून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना दि. ३१ जुलै रोजी दुपारी १ वा. सुमारास घडली. या प्रकरणी गहागर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदेश शंकर खेतले (३२, रा. अंजनवेल मराठवाडी, गुहागर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ शैलेश शंकर खेतले (३५. रा.अंजनवेल मराठवाडी, गुहागर) याने गहागर पोलिसांकडे खबर दिली आहे. त्यानुसार संदेशचे लग्न ठरत नव्हते. या कारणातून त्याने दारूच्या नशेत शुक्रवारी दुपारी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदेशला मृत घोषित केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:26 PM 03-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here