शुभम युवराज पवार याने स्वित्झर्लंडमधील श्री चिन्माॅय स्वीम मॅरेथॉन स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले

0

ठाणे : येथील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू शुभम युवराज पवार याने ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या श्री चिन्माॅय स्वीम मॅरेथॉन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत त्याने २६.७ किमी अंतर ८ तास ५ मिनिटांमध्ये पार केले. त्याला पाचवे स्थान मिळाले. अशी कामगिरी करणारा तो आशिया खंडातील एकमेव जलतरणपट आहे, शुभम हा सहाव्या वर्षापासून जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. तो ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करीत असून महापालिकेचे प्रशिक्षक अतुल पुरंदरे व कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत आहे. शुभमने आजवर राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये धवल यश प्राप्त केले आहे. लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धामध्येही त्याने अनेक पारितोषिके पटकाविली आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जलतरणातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल शुभमला महापौर मिनाक्षी शिंदे व उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. भविष्यात इंग्लिश खाडी पोहण्याचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here