मुलांचे आभासी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या भामट्यांपासून सावध रहा

0

रत्नागिरी :* सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. यामध्ये पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात आले आहे. सायबर भामटे आधी सोशल प्रोफायलिंग करून शक्यतो अशा जोडप्यांना लक्ष करतात जिथे आई, वडील दोघेही नोकरी करतात आणि त्यांचे पाल्य एकटे असते किंवा त्याच्याकडेपण मोबाईल असतात. सायबर भामटे विविध सोशल मिडियाद्वारे अशापाल्यांशी मैत्री करतात आणि त्यांचे फोटो, पालकांची माहिती काढून घेतात. त्यानंतर पाल्यास काही काळाकरिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात, त्याच सुमारास या पालकांस खोटे व्हिडीओ बनवून किंवा फेक फोटो बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे, अशा आशयाचा फोन करतात किंवा मेसेज पाठवतात. तसेच खंडणीची मागणी करतात. सायबर भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:15 PM 04/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here