‘आधी कोकणातील मृत्यूंचा आकडा पहा आणि मग निर्णय घ्या’

0

रत्नागिरी : चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णया विरोधात येथील स्थानिक संताप व्यक्त करू लागला आहे. कोरोना काळात जिल्ह्याकडे ढुंकूनही न बघणाऱ्या पालकमंत्र्यांच्या नावाने भर श्रावणात आता येथील स्थानिक शिमगा करू लागला आहे. अनिल परब हे केवळ नावालाच पालकमंत्री असून आजवर जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणेकडे त्यांनी ढुंकूनही न पाहिल्याचे बोलले जात आहे. अशा या पालकमंत्र्यांनी येथील स्थानिक जनतेचे आरोग्य व येथील शरपंजर झालेली आरोग्य यंत्रणा विचारात न घेताच चाकरमान्यांना कोकणात आणण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे, जिल्हा रुग्णालय हाउस फुल्ल आहे, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. या कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे येथील संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असे मत जनतेतून व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:34 PM 04/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here