रायगडात संततधार; पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर

0

अलिबाग : रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्‍हयाच्‍या सर्वच भागात जोरदार सरी कोसळत आहेत. महाडसह पोलादपूर, माणगाव, म्हसळा, अलिबाग, रोहा, पाली तळा या तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. सावित्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका व अंबा नदीचे पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे. महाड बाजारपेठेत कालपासून आलेले पुराचे पाणी कमी व्‍हायचं नाव घेत नाही. शहरातील काही भागात तीन फुटांपर्यंत पाणी असून ते वाढत चालले आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. माणगाव जवळ घोडनदीला पूर आल्याने वाहतूक भिरा निजामपूर मार्गे वळवली आहे. महाडमधील पुराचा धोका लक्षात घेवून आपत्‍कालीन यंत्रणा सज्‍ज ठेवण्‍यात आली आहे. १०० हून अधिक नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्‍यात आले आहे. नगरपालिकेच्‍या दोन आणि खासगी चार बोटी मनुष्‍यबळासह आपत्‍कालीन परीस्थितीत वापरण्‍यासाठी सज्‍ज आहेत. नगरपालिकेने सायरन वाजवून सतर्कतेचा इशारा दिला असल्‍याचे महाड नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:17 PM 05-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here