मिऱ्या वासियांनी केले असेही आंदोलन पण तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

0

रत्नागिरी : जिल्हाभरात पडणारा मुसळधार पाउस आणि भरतीच्या वेळी समुद्राला आलेले उधाण यामुळे मिऱ्या संरक्षक बंधाऱ्याला पुन्हा एकदा भगदाड पडले आहे. समुद्राचे खवळलेले पाणी किनारपट्टी भागात शिरल्याने तेथील घरे आणि बगयातीला धोका निर्माण झाला आहे. आजवर अनेक आंदोलने करूनही प्रशासन इकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या परिस्थितीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आता विविध पद्धतीने मिऱ्या ग्रामस्थ आंदोलने करीत आहेत. काही दिवसांपूर्वी संदीप शिरधनकर या तरुणाने बंधाऱ्यावर जाऊन निषेध म्हणून स्वतःचे मुंडण करून घेतले तर आज याच तरुणाने जय श्री राम लिहिलेला दगड बंधाऱ्यावर ठेऊन भगवा झेंडा फडकवला. यावेळी अप्पा वांदरकर, चिराग सावंत, बाबा शिवलकर, नागेश शेट्ये, गोट्या कीर, ययाती शिवलकर, उदय पाटील, रोशन मयेकर, साहिल मयेकर, शिवं बोरकर, बंड्या मयेकर, ओमकार पाटील, रोहन बनप, तुषार पाटील आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:38 PM 05/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here