चाकरमान्यांच्या स्वागताला जिल्हा प्रशासन सज्ज; कडक नियमांची अंमलबजावणी होणार

0

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या स्वागताला जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून शासनाच्या धोरणानुसार चाकरमान्यांना कोकणात येण्यास परवानगी देण्यात आली आहे. कशेडी घाटात एसटी ला चेकिंगला थांबवण्यात येणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले कि कोव्हीड लक्षणे असणाऱ्या सर्वांची अँटी जेन टेस्ट केली जाणार आहे.. कोरोना लॅब ची क्षमता वाढवण्यात येणार आहे. गृह विलगीकरणाचा कालावधी १० दिवस करण्यात येणार आहे. येणाऱ्या लोकांमुळे संसर्ग वधू शकतो म्हणून विलगीकरणाची क्षमता दुप्पट करण्यात येणार. होम क्वारंटाईन व्यक्तींना बाहेर फिरण्यास परावाणी नसणार आहे. सार्वजनी भजनात देखील त्यांनी सहभागी व्हायचे नाही आहे. याबाबत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. याकामी खासगी डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टर, ग्रामीण यंत्रणेकडून १० डॉक्टर घेण्यात आले आहेत. आयएमए च्या सहकार्याने हे सर्व करणात येणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून स्वच्छता करणार तसेच ५६ सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी खासगी हॉस्पिटलना परवानगी देण्यात आली आहे. या दहा दिवसात सुमारे दीड लाख चाकरमानी कोकणात येण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:06 PM 05/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here