सावंतवाडी रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्प्रेसला थांबा

0

कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्प्रेस शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1:44 मिनिटांनी येणार आहे.  गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी जनशताब्दीला सावंतवाडी रेल्वेस्थानकावर थांबा मिळालाल्याने सावंतवाडी,वेंगुर्ले, दोडामार्ग भागातील  रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे. सावंतवाडी भागातील रेल्वे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेवून खा. विनायक राऊत यांनी यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा फायदा सावंतवाडीसह  वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यांतील प्रवाशांना होतो. मात्र दादर- मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्प्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबत नव्हती. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गाडीला सावंतवाडीत थांबा मिळावा, अशी मागणी वारंवार  केली जात होती.  या समस्येची खा. विनायक राऊत यांनी दखल घेवून मध्य रेल्वेचे अधिकारी ए.के. गुप्ता व कोकण रेल्वेचे अधिकारी व्ही.सी.सिन्हा यांच्या समवेत  झालेल्या बैठकीत जनशताब्दी एक्प्रेस व तुतारी, कोकणकन्या आदी  गाड्यांच्या प्रश्‍नांबाबत लक्ष वेधले होते. त्यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी खा. राऊत यांना गणेशोत्सवापूर्वी आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार जनशताब्दी एक्प्रेसला 30 ऑगस्टपासून सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा दिला आहे. जनशताब्दीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळाल्याने गणेशोत्सवाला येणार्‍या रेल्वे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी एक्प्रेसलाही चार अतिरीक्‍त डबे जोडण्यात येणार असल्याने  रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here