नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या भामट्याला संगमेश्वर पोलिसांनी केले जेरबंद

0

संगमेश्वर : मी आर्मीमध्ये कामाला असून तुला नोकरीला लावतो, असे सांगत पैसे मागून फसवणूक करणाऱ्या भामट्याला संगमेश्वर पोलिसानी सापळा रचत पकडले. अभिषेक उर्फ अभिजित विजय डिंगणकर असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो पाचेरीसडा गुहागर येथील रहिवासी आहे. याबाबत रोहित वसंत कोंडविलकर याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेकने रोहित याला मी आर्मीमध्ये कामाला असून तुला नोकरीला लावतो असे सांगत 80 हजार रुपये टप्याटप्याने घेतले होते. हे पैसे त्याने आपल्या खात्यावर न घेता ‘गुगल पे’ने मित्राच्या खात्यावर भरण्यास सांगून ते एटीएमद्वारे काढून घेतले. तसेच संगमेश्वर मधील एका खासगी डॉक्टरलाही उसने पैसे घेत 10 हजार रुपयांना फसवले आहे. मैत्री आणि नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या भामट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. पोलीस संतोष झापडेकर, मानके, मसुरकर यांनी अभिषेकला संगमेश्वर बस स्थानकात अलगद पकडले. अभिषेकवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:44 PM 06-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here