खेड : येथील रेल्वे स्थानकात तोडफोड करत तुफान दगडफेक करणाऱ्या मनोरुग्णाची रवानगी पोलिसांनी रत्नागिरीतील जिल्हा मनोरुग्णालयात रवानगी केली आहे. तर दगड फेकीत जखमी झालेल्या प्रवाशी तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गणेश घुले [रा.अहमदनगर] असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. सोमवारी मनोरुग्णाने केलेल्या दगड फेकीत गणेश हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ कळबंणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्या माथेफिरूस देखील रत्नागिरी येथील जिल्हा मनोरुग्णालयात दाखल केले आहे.
