सिंधुदुर्गनगरीत क्रीडापटूंसाठी निवासी संकुल उभारणार

0

सिंधुदुर्गनगरी : जिल्हयातील शिक्षण, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्या लवकरच मार्गी लावू. जिल्ह्यात क्रीडा स्पर्धांसाठी येणार्‍या मुलांना राहण्याची सुविधा व्हावी, यासाठी निवासी संकुल उभारण्यास निधी उपलब्ध करू, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी संवाद सभेत दिली. दिला जाईल असे सांगतानाच आपल्याला मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे. फक्त त्या सर्वच गोष्टि आता सांगणे शक्य नाही मात्र येणार सण हा आपला गोड होईल याची ग्वाही देतो असे प्रतिपादन  शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.  आशिष शेलार यांनी संवाद सभेत बोलताना दिली. जिल्ह्यातील शिक्षक, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन त्यावर  तोडगा काढण्यासाठी आयोजित संवाद सभा शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली.  जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी आ. अजित गोगटे, अतुल काळसेकर, संदेश पारकर, अतुल रावराणे, जयदेव कदम, राजू राऊळ तसेच शिक्षण व क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कला, क्रीडा, शिक्षक, संस्थाचालक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला क्रीडा, युवक कल्याण तथा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कला क्रीडा शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वेतनेत्तर अनुदान सर्व शाळांना सरसकट द्यावे, शिक्षकांची आणि विभागातील रिक्‍त पदे तात्काळ भरावीत,  शालार्थची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात यावीत,  मुख्याध्यापक नियुक्‍ती कायमस्वरूपी देण्यात यावी, मयत शिक्षक कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला अनुकंपाचा लाभ द‍्यावा, गणवेश  देताना अनुदानुत आणि विनाअनुदानित असा भेद करू नये, कला शिक्षकांना अतिरिक्‍त ठरवू नये, कला शिक्षक पदे पवित्र पोर्टल वर यावीत, क्रीडा विभागातील रिक्‍त पदे भरावीत, आदी मांगण्यांकडे संघटना प्रतिनिधींनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. पटसंख्येनुसार शिक्षक निर्णयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे डोंगराळ भागाचा निकष लावून जिल्ह्याला कमी पटसंख्येच्या नियमात सवलत द्यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली. शिक्षक संघटनेच्या समस्या जाणून घेतल्यानंतर  ना. आशीष शेलार म्हणाले, शिक्षक संघटनाच्या मागण्या रास्त आहेत. त्या सोडविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असे सांगत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये कमी पडतात. हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये कसे यशस्वी होतील यासाठी प्रयत्न व्हावेत. सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात मोडत असल्याने येथील मुलांच्या पटसंख्येनुसार शिक्षक न देता येथील भौगिलिक परिस्थिति लक्षात घेता पटसंख्येनुसार शिक्षक देण्याच्या निर्णयावर पुनर्विलोकन करण्याचे आदेश आपण दिले आहेत. अंशदायी पेन्शन योजनेबाबत मंत्रालयात निर्णय घेतला जाईल. कला क्रीडा शिक्षक पदांना संरक्षण देवून त्यांना पवित्र पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी आपण सकारात्मक असून त्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. शालार्थ वेतनेत्तर अनुदानसाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्गनगरी येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व्हाव्यात यासाठी निवासी क्रीडा संकुल मंजूर करून त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ग्वाही, त्यांनी दिली. आपल्याला मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे. फक्‍त त्या सर्वच गोष्टी आता सांगणे शक्य नाही. मात्र येणार सण आपला गोड होईल, याची ग्वाही देतो असे सूचक वक्‍तव्य त्यांनी केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here