कुडाळात कोव्हिड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू

0

कुडाळ : कोव्हिड-19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर शनिवार पासून सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ (मुंबई-गोवा महामार्ग लगतच्या) येथील विश्रामगृह येथे हे सेंटर सुरू करण्यात आले असून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फीत कापून याचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये अँटीजेन टेस्ट किटद्वारे नागरिकांची कोविड -19 टेस्ट केली जाणार आहे. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प.माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, जि.प सदस्य अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नलावडे, कुडाळ ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव घुर्ये, माजी जि.प.सदस्य संजय भोगटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, वर्षा कुडाळकर, पं.स.सदस्या श्रेया परब, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, विभाग प्रमुख बबन बोभाटे, सरपंच नागेश आईर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, युवासेना तालुका प्रमुख राजू जांभेकर, नगरसेविका प्रज्ञा राणे, राजू गवंडे, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, संदीप म्हाडेश्वर, कृष्णा तेली, जीवन बांदेकर, सुयोग ढवण, बाबी गुरव, नितीन सावंत, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:39 PM 10-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here