पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र डॉक्टरांची सोय

0

रत्नागिरी : कोरोनाने पोलिसांनाही गाठले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४ कर्मचारी आणि २ पोलिस अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली असून यातील ५ कर्मचारी बरे होऊन ड्यूटीवर हजर देखील झाले आहेत. ही संख्या लवकर आटोक्यात यावी यासाठी जिल्हा पोलिस मुख्यालय येथे ४० बेडचे क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहे. याठिकाणी स्वतंत्र डॉक्टर आणि नर्स ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मंढे यांनी दिली. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यामध्ये कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या ३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये २ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पोलिसांवर त्वरित उपचार व्हावे, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवता यावे यासाठी पोलिस मुख्यालय येथे ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. गणेशोत्सवात पोलिसांवर अधिक ताण पडू नये यासाठी पोलिस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. गैरवर्तन आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे डॉ. मुंढे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:41 PM 10-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here