देवरूख : देवरुख आगारातील एसटी बस गळक्या असल्याची बोंब ताजी असतानाच आता बसेसच्या आतील भाग तुटका फुटका असल्याने प्रवासी वर्गाकडून आगाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारी आगारातून सकाळी ११.१५ वा. सोडण्यात आलेल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशन ही बस अत्यंत खराबसोडण्यात आली होती.गाडीतील अनेक सीट या तुटलेल्या होत्या. गाडीतील आसनांचे स्पंज खराब झाले आहेत. स्पंजबरोबर सीटचे पत्रे देखील फाटलेले असून त्यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याची भीती व्यक्त होत आहे. याचबरोबर या गाडीतील सामान ठेवण्यासाठी असलेले रॅक देखील तुटलेले आहेत. सीटच्या बाजूचे पत्रे फाटलेले असल्याने प्रवासी आगाराच्या कारभारावर नाराज आहेत. आगार प्रवासांच्या जीविताशी खेळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. खराब बसेसपैकी एम. एच. २० बीएल २४८ ही खराब बस त्वरित दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
