आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चिपळूण तालुक्यातून दोन शिक्षकांचे प्रस्ताव सादर

0

चिपळूण : जिल्हा परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चिपळूण तालुक्यातून राजेंद्र महाडिक व दीपक मोने या दोन शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आता यापैकी कोणाच्या पदारात पुरस्काराचे दान पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षकांना दरवर्षी दि. ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षकांचे प्रस्ताव जि. प.कडे सादर केले जातात. त्यानंतर अंतिम मुलाखतीनंतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड केली जाते. चिपळूण तालुक्यातून यावर्षी दोन प्रस्ताव जि. प.कडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये कोळकेवाडी शाळा नं. १ मधील दीपक मोने व खांदाटपाली शाळेतून राजेंद्र महाडिक या दोन शिक्षकांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यातून पुरस्कारासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here