आता सार्वजनिक शौचालये दिसणार गुगल मॅपवर

0

रत्नागिरी : आता तुम्ही गुगल मॅपवर तुमच्या जवळ असलेले शौचालय काही मिनिटांतच शोधू शकणार आहात. प्रवास करताना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे गरज भासल्यास सार्वजनिक शौचालय शोधणे. मात्र, ही ती चिंता आता मिटणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. त्याचबरोबर शहरात किंवा जिल्ह्यात बाहेरून आलेल्या पर्यटकांनाही याचा फायदा होणार आहे. आता गाव तेथे सार्वजनिक शौचालय ही संकल्पनाही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्यात 306 सार्वजनिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शौचालयाला 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:58 AM 11/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here