गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीकडे व्यावसायिकांची पाठ

0

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोचे उत्पन्न मिळवून देणार्‍या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यवसायिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसते. जिल्ह्यातील 41 तलावांच्या लिलावातून वर्षाला सुमारे आठ लाखाचे उत्पन्न मत्स्य विभागाला मिळते. मात्र मत्स्य बिज तयार न होते, तलावात सुक्ष्म खाद्य तयार न होणे, मागणी नसने आणि मासे पकडण्यासाठी कामगार न मिळणे, अशा अनेक अडचणीमुळे गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला उतरती कळा लागली आहे. यंदा फक्त 23 तलावांचा लिलाव होऊन पावणे चार लाखाच्या महसुलावर समाधान मानावे लागले आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा असल्याने खार्‍या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. तरी पश्‍चिम महाराष्ट्रात चालणार्‍या गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा चांगला प्रयोग जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेल्या 41 तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जात होते. त्यामध्ये त्यामध्ये कटला, कोळंबी, रोह आदी प्रकारची मत्स्य शेती घेतली जाते. हेक्टरी 300 रुपये या प्रमाणे तलावाचा लिलाव होतो. सुमारे 100 ते 120 हेक्टरचे तलाव आहे. लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यवसायिक त्यामध्ये माशाचे बिज सोडले जाते. मात्र बहुतेक तलाव हे सह्याद्रीत्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतरही काही महिने या भागातील दर्‍या खोर्‍यातील पाणी वाहात राहाते. यामुळे तलाव भरून उलटुन वाहात राहात. त्यामुळे बहुतांशी पिल्ली वाहुन जातात. तसेच जांभ्या दगडामध्ये सर्व तलाव आहेत. यामध्ये माशांना आवश्यक असणारे सुक्ष्म खाद्य तयार होत नाही. माशांना पोषक वातावरण मिळत नसल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी कामगार मिळत नाहीत. गोड्या पाण्यातील माशांना खार्‍या पाण्यातील माशांप्रमाणे चव लागत नाही. काटे भरपुर असल्याने त्याची मागणी अल्प आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीपुढे अशी अनेक संकट आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तलावातील मत्स्य शेतीकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे. यंदा फक्त 23 तलावांचाच लिलाव झाला आहे. यातून मत्स्य खात्याला पावणे चार लाख महसुल मिळला आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला उभारी देण्यासाठी आता प्रयोगशील व्यवसायिकाची गरज आहे. तरच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय वाढीला लागणार आहे. अन्यथा हा व्यवसाय पुर्ण बसण्याच्या मार्गावर आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:12 PM 12-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here