स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आयडीबीआय मॅरेथॉन

0

भारताच्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी आयडीबीआय फेडरल फ्यूचर फेअरलेस मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या शर्यतीला सुरुवात होणार आहे. कोविड 19 या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी तसेच भारताच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडच्या संकटातून प्रत्येक हिंदुस्थानी बाहेर येऊन त्यांच्यात सकारात्मकता निर्माण व्हावी हेच या मॅरेथॉनचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेहमीच चांगले राहायला हवे. या काळातही उत्साही धावपटूंनी आयडीबीआय फेडरल फ्यूचर फिअरलेस मॅरेथॉनसाठी नोंदणी केलेली पाहून मला आश्चर्य वाटते, असे आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे ब्रँड ऍम्बेसेडर सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाले. धावपटूंनी काळजी घेत आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन केले पाहिजे असे म्हणत सचिन तेंडुलकर यांनी धावपटूंना शुभेच्छा दिल्या. एनईबी स्पोर्टस् आयोजित मॅरेथॉनसाठी 6 हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. ही मॅरेथॉन चार प्रकारांत होणार असून पूर्ण मॅरेथॉन 42.2 किलोमीटर, अर्धमॅरेथॉन 21.1 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:16 PM 12-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here