रत्नागिरी नाचणे येथील घरफोडी प्रकरणी तीन आरोपींना कोल्हापुरातून अटक

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथील घराच्या किचन खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून त्यावाटे घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्‍कम, एनएससी पोस्टाची व सोसायटी सर्टिफिकेट असा एकूण 4 लाख 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. चोरीची ही घटना 23 जुलै रोजी सकाळी 8 ते 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वा. कालावधीत घडली होती. ओंकार सतीश जाधव (वय 19, रा. कदमवाडी ता. करवीर, कोल्हापूर), संदेश सर्जेराव पानारी (20, रा. नेर्ली  ता. करवीर, कोल्हापूर) आणि अजित अशोक कांबळे (19, रा. कणेरी फाटा ता.करवीर, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत जीवन अनंत वायंगणकर (67, रा.अभ्युदयनगर रोड,नाचणे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, जीवन वायंगणकर आपल्या कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते. या कालावधीत त्यांच्या घरी चोरी झाली होती. याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांनी या तिन्ही संशयितांना या चोरीप्रकरणी वर्ग करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here