सिंधुदुर्गात ३७६ जण कोरोना मुक्त; सक्रीय रुग्ण १५४

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात बुधवारी आणखी १६ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५३८ झाली आहे. यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कंटेनमेंट झोनची संख्या ५६ झाली आहे. २ मे पासून जिल्ह्यात १ लाख ९५ हजार ५२७ चाकरमानी जिल्हयात आले आहेत. ८४५२ जणांचा स्वाब तपासणी करण्यात आली असून ७६४० जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. २७४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:42 AM 13-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here