साडवली येथे १७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

0

देवरूख : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित इंदिरा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालय, सिव्हील हॉस्पिटल रक्तपेढी रत्नागिरी आणि देवरूख ग्रामीण रूग्णालय आयसीटीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑगस्ट रोजी साडवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर फार्मसी महाविद्यालयात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात येणार आहे. शिबिराच्या अधिक महितीसाठी सुजीत नगरे (७५८८१७७०५०), अमोल खाडे (९४८२०७३९२०), विपुल संसारे (८६९२९३०७४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:07 PM 13-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here