रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला असताना पाठ फिरवलेल्या पावसाचा शेवटचा टप्पा दहिहंडीनंतर म्हणजे २६ ऑगस्टपासून सुरू होईल, असा अंदाज कलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, सरासरी गाठली आहे. मात्र, २६ ऑगस्टला जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानुसार प्रशासनाने किनारी आणि दुर्गम भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली असून, अपवादात्मक सरींचा शिडकावा झाल्या. गुरुवारी दिवसभर वातावरण कोरडे होते. गेले दोन दिवस जिल्ह्यात दीड ते दोन मि.मी. सरासरी पाऊस होत असून, पावसाने साडेतीन हजार मि.मी.ची सरासरी पूर्ण केली आहे. मात्र, २६ ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर राहणार आहे. या कालावधीत काही भागात जोरदार पवसाची शक्यता वेधशाळेने हवाई संदेशात वर्तविली आहे. जोरदार पावसाचे सातत्य या कालावधीत मंडणगड, दापोली, खेड या पट्ट्यात राहणार असून अन्य तालुक्यातही पावसाचे सातत्य राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने किनारी भागासह दुर्गम भागात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.
