लेन्स आर्ट रत्नागिरी आयोजित छायाचित्रण स्पर्धा

0

लेन्स आर्ट रत्नागिरी आयोजित छायाचित्रण स्पर्धा…

जागतिक छायाचित्रण दिन २०२०

निसर्ग आणि फोटोग्राफी एक अतूट असं नातं आहे.. या नात्यातूनच निसर्गाबद्दल एक आत्मीयता निर्माण झालेली आहे.. जागतिक छायाचित्र दिवस २०२० जवळ आलेला आहे.. तर मग या दोघांची आपण सांगड घालूया का? तर त्यादृष्टीने एक छोटंसं पाऊल आम्ही उचलत आहोत.. सध्याच्या करोनाच्या काळात करोनाचे काळे ढग डोक्यावर दाटून आलेले असताना सुद्धा बहरून आलेली श्रावण पालवी आणि त्यावर पडणारं श्रावणातलं कोवळं ऊन हे बघितल्यावर हातात कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन ते टिपलं नाहीये असं होऊच शकत नाही.. असा हा श्रावण महिना सर्वांगाने खरंतर खूपच सुंदर असतो… तर असाच सुंदर महिना तुमच्या नजेरतून आम्हाला सुद्धा बघायला आवडेल..
त्यामुळे लेन्स आर्ट रत्नागिरी एक online छायाचित्र स्पर्धा मोबाईल तसेच कॅमेरा वापरणाऱ्यांसाठी आयोजित करत आहे. स्पर्धेचा विषय तुमच्या आमच्या भावनेचाच आहे…

श्रावणातले कोंकण

आपले पर्यावरण आणि संस्कृती याचा ताळमेळ ठेऊन साजरे केले जाणारे श्रावणातले सण, श्रावणात बहरणारा निसर्ग, विविध कलाकृतीने नटलेला कोंकण, आणि कोंकणात राहणारी शहाळ्यासारखी गोड अंतरंगाची माणसे असा एकंदरीत सगळा श्रावण महिना आपल्याला साजवायचा आहे..

तर घरातच राहून आणि सगळे lockdown आणि सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम पाळूनच आपल्याला ही स्पर्धा पार पाडायची आहे..

स्पर्धेच्या फोटोंचे एक छोटेखानी प्रदर्शन ऑनलाईन भरवता येऊ शकते का यावर सुद्धा आमचा विचार सुरू आहे.. स्पर्धे मधून दोन्ही विभागातून 3-3 विजेते फोटो निवडण्यात येतील आणि त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील… सगळ्या स्पर्धकांना e-certificates देण्यात येतील.

ही स्पर्धा फक्त रत्नागिरी मधील सर्व फोटोग्राफी प्रेमींसाठीच मर्यादित आहे..

फोटो पाठवताना पुढील तांत्रिक बाबींची पूर्तता करावी.

1) स्पर्धेचे दोन ग्रुप असतील
a)मोबाईल
b)कॅमेरा
2) विषयाला धरून फक्त एकच फोटो दिलेल्या गूगल फॉर्म वरती पाठवावा.
3) मोबाईल वरून काढलेल्या फोटोचे रेसोल्युशन, साईझ आणि क्वालिटी चेक करूनच फोटो सिलेक्ट करण्यात येईल.
4)https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScueLG0kXbnCGrxmZS3MytsEAuQaUw4HHL5PR8CI8UzNERK-Q/viewform या लिंक वर फोटो अपलोड करावेत.
5)१८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता फोटो अपलोड करण्याची लिंक बंद करण्यात येईल.
6) फोटो एडिट करताना मूळ विषयात कुठल्याही प्रकारचा बदल केल्यास फोटो ग्राह्य धरण्यात येणार नाही.
7) फोटोवर कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क अथवा लोगो नसावा.
8) फोटोला बॉर्डर अथवा shadow effect दिलेला नसावा.
9)निवड आणि प्रदर्शनाबाबतचे सर्व हक्क LensArt Core Team कडे राहतील.
10) एका स्पर्धकाला फक्त एकाच ग्रुप मधून सहभागी होता येईल.
11) वरील अटी परिपूर्ण न झालेले फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत.

कोणालाही स्पर्धेबाबत काहीही शंका असल्यास अथवा मदत लागल्यास पुढील पैकी कोणाशीही संपर्क साधावा.

नेत्रा आपटे : 9850999481
उपेंद्र बापट : 9881240824
सिद्धेश वैद्य : 9970245962
विवेक सोहनी : 9422474546

लेन्स आर्ट, रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here