चिपळुणातील फरशी तिठा येथून मोटारसायकल लांबवली

0

चिपळूण : शहरानजीकच्या फरशी तिठा येथील एक मोटारसायकल लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिल काशिराम चव्हाण (रा. मिरजोळी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १० ऑगस्ट रोजी दुपारच्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, फरशी तिठा येथे काळ्या रंगाची स्प्लेंडर उभी करून ठेवली होती. मात्र, अज्ञाताने ती चोरून नेली. यामुळे त्यांचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:37 AM 14-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here