‘लेफ्ट हँडर्स डे’च्या निमित्ताने युवीचा डावखुऱ्या खेळाडूंना सलाम

0

मुंबई : भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने गुरुवारी ‘आंतरराष्ट्रीय डावखुरा दिना’ निमित्ताने क्रिकेटमधील दिग्गज डावकरी खेळाडूंना सलाम केला आहे. यावेळी युवराजने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट फोटो शेअर करत कौतुक केले आहे. युवराज स्वत: डावखुरा फलंदाज आहे आणि त्याने वनडे क्रिकेटमध्ये अनेक सामने डाव्या हाताने फलंदाजी करताना एक हाती जिंकून दिले आहेत. युवराजने 2000 मध्ये केनियाविरुद्ध खेळताना वनडे सामन्यात पदार्पण केले होते. त्याने कारकिर्दीच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाकेबाज अर्धशतकी खेळीही केली होती. 38 वर्षीय युवराज 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषकामध्ये भारताला विजेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. युवराजने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जून 2017 मध्ये खेळला होता. तसेच जून 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या युवराज विदेशातील टी 20 लीगमध्ये खेळताना दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:47 PM 14-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here