लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

0

नवी दिल्ली : आज १५ ऑगस्ट २०२०, देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. तर, यंदा कोरोनाचा सावटामुळे सर्वत्र हा दिवस साधेपणाने साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरील सोहळ्याची देखील खास खबरदारी घेतली गेली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास गार्ड ऑफ हॉनर दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ७ व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. नंतर देशवासीयांना संबोधित केले. ‘मेरे प्यारे देशवासियों…’ अशा शब्दांत मोदींनी या संबोधनाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कोरोनाच्या संकटाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एखाद्या योद्धयाप्रमाणे सामोरे जाणाऱ्या डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, रुग्णालय कर्मचारी यांच्या कामाचा उल्लेख केला. तर या योद्धयाना त्यांनी नमन देखील केले. तसेच या युद्धात देखील भारत विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, भारताच्या महासत्ता होण्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा मंत्र हा या कोरोना काळात १३० कोटी भारतीयांसाठी महत्वाचा बनला असून हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच देशातील तरुण वर्ग,महिला शक्ती यांच्यावर पूर्ण विश्वास असून समृद्ध भारत बनवण्यासाठी मोठा वाटा तरुणांचा व महिलांचा असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला. आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल कधी पर्यंत देत राहणार आणि त्यांच्याकडून तयार वस्तू घेत राहणार असा सवाल उपस्थित करून आता आत्मनिर्भर व्हावंच लागेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता, व्होकल फॉर लोकल हा नारा महत्वाचा असून आत्मसात करणे गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांना जर वयाच्या २५ ते ३० वयाचे झाले असता कुटुंबीय हे आत्मनिर्भर होण्यास सांगतात, तर आपला देश आता ७५ व्या वर्षात पदार्पण करत असताना आता तरी आत्मनिर्भर होणे गरजेचं असल्याचं देखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे. यावेळीचा स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी साधेपणाने साजरा होत असला तरी खास देखील आहे. कोरोनामुक्त झालेल्या तब्बल १५०० योद्धयांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यापैकी ५०० स्थानिक पोलीस आहेत, तर १,००० देशाच्या विविध भागातील कोरोनामुक्त व्यक्तींचा यात समावेश आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:59 AM 15-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here