धक्कादायक : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची हॉस्पिटलमध्ये आत्महत्या

0

चिपळूण : कामथे रुग्णालयात एका ४५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ ऑगस्ट रोजी या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर कामथे येथील रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी रात्रि १२.३० च्या सुमारास या रुग्णाने हॉस्पिटलच्या गच्चीवर जाऊन हॉस्पिटल मधील चादारीनेच गळफास लावून घेतला. उपजिल्हा रुग्णालायचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती म्हात्रे यांनी पोलिसांना खबर दिली. आत्महत्या केलेला रुग्ण चिपळूण मधील आंबडस, खेड गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून नेमकं कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. कोरोना रुग्णाच्या आत्महत्येनंतर आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:08 PM 15/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here