सांगली येथील पूरबाधित लोकांना कोकणातून गणेशमूर्ती व गृहोपयोगी साहित्य मदत

0

खेड : सांगली जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालेल्या पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड च्या माध्यमातून दापोली – मंडणगड- खेड विधानसभा मतदार संघाचे आ. संजय कदम, मनसे नेते व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगली येथील पूरबाधित लोकांना कोकणातून गणेशमूर्ती व गृहोपयोगी साहित्य मदत स्वरूपात दिले. पुराच्या पाण्यामुळे गणपती बनविण्याचे कारखाने व मूर्ती वाहून गेल्या आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा होताना गणेश मूर्तीची कमतरता भासू नये म्हणून कोकणातून गणेश मूर्ती व गृहोपयोगी साहित्य मारुती चौक, हरीपुरराड, राजू गांधी नगर बायपास, कोल्हापूर रोड येथील पूरग्रस्तांना देण्यात आले. यावेळी मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, खेडचे नगरसेवक अजय माने, मनसे खेड तालुका उपाध्यक्ष नाना चाळके, नगरसेवक राजू संसारे, रिक्षा सेना जिल्हा अध्यक्ष सिंकदर बांगी, वाहतूक सेना शहर अध्यक्ष विशाल कापडी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here