राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या काजोल गुरवने पटकावले सुवर्णपदक

0

राजापूर :पश्चिम बंगाल राज्यातील कूचबिहार येथे झालेल्या सीनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या काजोल गुरवने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत काजोलने पश्चिम रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करत ५२ किलो वजनी गटात स्कॉट-१७५ किलो, बेंचप्रेस-९५किलो, डेडलिफ्ट१७५किलो असे एकूण ४४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ती अव्वल ठरली आहे. गतवर्षी देखील तिने सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. काजोल गेले चार वर्षापासून पश्चिम रेल्वेमध्ये सेवेत आहेत. काजोल तिच्या संपूर्ण स्पर्धे ची तयारी राजापूर येथे शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या व्यायामशाळेत तीचा भाऊ आणि मार्गदर्शक आशियाई सुवर्णपदक विजेता प्रतिक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित करत असते. गेली ६ वर्ष काजोल पॉवरलिफ्टिंगचा खेळ खेळत असून सुरुवातीची ३वर्ष महाराष्ट्रासाठी आणी नंतर पश्चिम रेल्वेसाठी तिने आजवर अनेक पदकाची कमाई केली. काजोल मेहनत याच्या जोरवर पदकांची कमाई करीत आहे, असे गुरव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here