रत्नागिरी : राजकारण राजकारणाच्या जागी ठेवावं हे संवेदनशील माणसाला वेगळ सांगायला नको. माजी खासदार निलेश राणे यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल ट्वीट करून दिली आणि त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून त्यांचे राजकीय विरोधक किरण सामंत यांनी देवाजवळ प्रार्थना केली. मागील काही वर्षांपासून राणे सामंत वाद पराकोटीला गेल्याचे कोकणातील लोकांनी पाहिले आहे. मात्र असे असूनही माजी खासदार निलेश राणे यांच्या आरोग्यासाठी देवाजवळ प्रार्थना करणारी किरण सामंत यांची फेसबुक वरील पोस्ट पाहून अनेकजण चक्रावले तर अनेकांनी या संवेदनशीलतेचे कौतुक केले. कालपासून फेसबुकवरील हि पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:17 AM 17/Aug/2020