लांजात पडवीवर झाड पडून नुकसान

0

लांजा : मुसळधार पावसाने आंबा कलमाचे झाड घरावर पडून घराच्या पडवीचे हजारो रुपयांचे नुकसान होण्याची घटना लांजा शहरातील खावडकरवाडी येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काही काळ लांजा शहराला झोडपून काढले. शहरातील खावडकरवाडी येथे स्मिता दत्तात्रय काळे यांचे घर असून घराशेजारीच आंबा कलमांची झाडे आहेत. यातील एक आंब्याचे झाड सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोराचा आवाज करत त्यांच्या घराच्या पडवीवर कोसळले. यामध्ये घराच्या पडवीवरील नळे फुटून, वासे मोडल्याने घराचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच लांजाचे तलाठी श्री.पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 17-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here