जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

0

खेड : खेड शहरालगत वाहणाच्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या असल्याने शहरातील व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाने व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेले चार दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुड़ी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी 6.50 तर धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे. काल रात्री जगबुडी इशारा पातळीवर वहात होती. मात्र आज दुपारी जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चिंता वाढू लागली. जगबुड़ी प्रमाणे नारिंगी नदीचे पाणीही वाढत आहे. त्यामुळे खेडची बाजारपेठ कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नातुवाडी, शिरवली, पिंपळवाडी, शेलारवाड़ी आणि तळवट या पाचही धरणामध्ये पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी जगबुडी नदीला मिळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. हे पाणी कधीही बाजारपेठेत घुसण्याची शक्यता असल्याने व्यापारी आणि शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:15 PM 17-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here