रत्नागिरी कोकण नगर येथील कोविड योद्ध्या डॉक्टरांचा सत्कार

0

रत्नागिरी : आज कोरोनाने जवळ जवळ पूर्ण जगालाच आपल्या विळख्यात घेतले आहे, आशा परिस्थितीत बरेचशे डॉक्टर घराबाहेर पडून आपल्या आपल्या दवाखान्यात रुग्णांना तपासात आहेत व आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशीच सेवा रत्नागिरी येथील कोकण नगर या मोठ्या भागात जीवाची पर्वा न करता सर्वच डॉक्टर देत आहेत. अशा या कोविड योद्ध्यांचा सम्मान करण्यात आला. यामध्ये डॉ.परवेज अन्सारी, डॉ. बुर्हान, डॉ. जाधव यांचा सन्मान PPE किट देऊन कोकण नगर पोलीस शहर चौकीत रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष DYSP माननीय श्री.इंगळे साहेब व माननीय रफिक बिजापुरी यांच्या हस्ते करण्यात आला. जे डॉक्टर उपस्थितीत नव्हते ते इतर ठिकाणी रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त असल्याने त्यांना येता आले नाही, त्या सर्व योद्ध्यांचा असाच सम्मान करण्यात येईल. यामध्ये कोकण नगर पोलीस चौकीचे ASI श्री. पाटील, कॉ- श्री. साळवी तसेच मुजफ्फर काझी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. नौसीन काझी यांनी PPE kit उपलब्ध करून देण्यात ज्यांचा खारीचा वाटा होता ते म्हणजे कोकणातील सर्वांचे लाडके सोसिलिस्ट खालिद भाई चौगुले यांचे मानवपूर्वक आभार मानले व अशा डॉक्टर योद्ध्यांसाठी सम्मानाचे काम पुढे सुरू ठेवण्याचे प्रयत्न करत राहू असे म्हटले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 18-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here