रत्नागिरी : मैत्रिणीच्या मोबाईलवर अश्लिल व्हॉईस मेसेज पाठवून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील तरुणाविरोधात शहर पोलिस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन अनिल यादव ( ३७, मुळ रा. महाबळेश्वर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील पिडीत तरुणी व रोहन यादव हे दोघे २०१७ ते २२ ऑगस्ट २०१९ दरम्यान रत्नागिरीतील एका फायनान्स कंपनीत कामाला होते. या दरम्यान त्यांच्यात ओळख होउन मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले होते . परंतु कालांतराने त्यांच्यात खटके उडू लागल्याने ती तरुणी त्याला इग्नोर करत होती. पिडीतेने तरुणास आता आपल्यात कोणतेही संबंध राहणार नसल्याचे सांगितले होते. परंतु तरुणाने तिला वारंवार फोन करुन तिचा पाठलाग केला होता .
गुरुवारी रोहन याने पिडीतेच्या मोबाईलवर तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल व्हॉईस मेसेज पाठवून ठार मारण्याची धमकी दिली होती, पिडीतेने याबाबत शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी रोहन याचे विरोधात भा.द.वि.क ३५४ अन्वये गुन्हा दाखल आहे.याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
