पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुंभारघाटी ते गणेशगुळे फाट्या दरम्यान बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ला केला. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. यात गणेशगुळेचे सरपंच संदीप शिंदे जखमी झाले आहेत. पण त्यानंतर बिबट्याने थोड्या थोड्यावेळाने काहीजणांवर हल्ला केला. यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सरपंच शिंदे आणि विश्वास सुर्वे हे घरी निघाले होते. गणेशगुळेला जात असतानाच बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी निखिल साळवी व बळीराम जोशीलकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला.
