रत्नागिरी – राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून होणाऱ्या मनमानी भाडेदराला परिवहन आयुक्तांनी चाप लावला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) त्या, त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर विचारत घेतले जाणार आहेत. खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक भाडेवाढ करता येणार नाही. तसे झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
गणेशोत्सव काळामध्ये खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून वारेमाप भाडेवाढ केली आहे. त्या अनुषंगाने परिवहन आयुक्तांच्या 21 ऑगस्टच्या पत्रानुसार राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत नवीन आदेश राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
