कोकण रेल्वे मार्गवरुन धावणारी तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

0

खेड : कोकण रेल्वे मार्गवरुन धावणारी तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत वेळेत बदल करण्यात आला आहे. दादर-सावंतवाडी रोड-दादर गाडी दादर स्थानकातून रात्री ११.४५ वाजता सुटणारी गाडी आता रात्री १२.१० वाजता सुटणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात दादरसावंतवाडी रोड या तुतारी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यासाठी दादरसावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेसला टू टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचा एक, स्लीपर क्लासचे ७, जनरल क्लासचे ८ तर सेकण्ड क्लासचे २ असे एकूण १९ कोच असणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकातील फलाट क्रमाक ५ वरून रात्री १२.१० वाजता सुटणार आहे. ती सावंतवाडी रोडला दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासावेळी तुतारी एक्स्प्रेस सकाळी ६.३० वाजता दादर स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर दाखल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here