दादांच्या मुलाला अण्णांच्या मुलांनी दिल्या शुभेच्छा

0

रत्नागिरी : भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खा. निलेश राणे यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्वीट करताच अनेकांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय झाला उद्योजक अण्णा सामंत यांचे सुपुत्र कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी दिलेल्या शुभेच्छांचा. कोकणातील पक्के राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या या नेत्यांच्या संवेदना किती जागृत आहेत याचे हे उत्तम उदाहरण. ना. उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांच्या शुभेच्छांचा मोठ्या मनाने स्वीकार करत या दोघांनाही माजी खा. निलेश राणे यांनी धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे दादांच्या मुलाला अण्णांच्या मुलांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:18 AM 19/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here