कुडाळमध्ये महिला व बाल रुग्णालयासाठी 1 कोटींचा निधी मंजूर

0

कुडाळ : कुडाळ येथील तहसीलदार कार्यालय नजिक साकारण्यात आलेल्या महिला व बाल रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून या रुग्णालयाकरिता 97 अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच या रुग्णालयाचे कार्यालयीन कामकाज व आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद वालावलकर यांची कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी 1 कोटीच्या निधीस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी तसेच रुग्णालयात अधिकारी कर्मचारी तसेच इतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी त्याचप्रमाणे आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. त्याअनुषंगाने या रुग्णालयाचे काम गतीने केले जात आहे. अलीकडेच रुग्णालयात विद्युतीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला असून हे काम प्रगतीपथावर आहे. मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयाचे कार्यालयीन कामकाज व आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद वालावलकर यांची कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाकरिता 97 अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे महिला व बाल रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी 1 कोटीच्या निधीस आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 19-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here