जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ६६० गणपती होणार विराजमान

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गणेशोत्सवाच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र प्रत्यक्षात ७३ गणपतींची वाढच झाली आहे. वर्षी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ घरगुती गणेशोत्सव होते. यावर्षी १ लाख ६६ हजार ६६० घरी गणपतीचे पूजन केले जाणार आहे. गेल्यावर्षी ११२ सार्वजनिक गणेशोत्सव होते. यावर्षी ते चारने घटून १०८ झाले आहेत. प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांनी दिलेल्या आकडेवारीच्या आधारे जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 19-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here