मिरजोळे एमआयडीसीतून टेम्पो चोरीस

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील कंपाऊंडमधून सुमारे ५ लाख रुपयांचा टेम्पो लांबविल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०१९ या कालावधीत घडली आहे. याबाबत जितेंद्र विजय कदम (३२,रा क्रांतीनगर, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार, जितेंद्र कदम यांनी आपल्या मालकीचा टेम्पो (एमएच-०८-एपी-४०४१) जहीर शेख यांच्या एमआयडीसी येथील प्लॉटमध्ये पार्क करुन ठेवला होता. तो अज्ञाताने लांबवल्याचे गुरुवारी कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने याबाबत ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here