भूस्खलनामुळे कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या सहा गाड्या रद्द

0

रत्नागिरी : दक्षिण रेल्वेच्या हद्दीत केरळमध्ये पालघाट विभागात झालेल्या भूस्खलनामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून पाच गाड्या पर्यायीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. पालघाट विभागात झालेल्या भूस्खलनाचा फटका रेल्वेला बसला आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या आणि दि. 23 ऑगस्ट रोजी सुटणार्‍या गरीब रथ (12201), एर्नाकुलम – ओखा एक्स्प्रेस (16338), हजरत निझामुद्दीन – त्रिवेंद्रम (22634),  जामनगर    तिरुनेलवेली (19578) तर दि. 241 ऑगस्ट रोजीच्या त्रिवेंद्रम – हजरत निझामुद्दीन (22653), ओखा – एर्नाकुलम (216337)  या सह गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर तिरुअनंतपुरम – ह. निझामुद्दीन, कोचुवेली – इंदोर, नेत्रावती एक्स्प्रेस, पोरबंदर –  कोचुवेली, मंगला एक्स्प्रेस या  कोकण     रेल्वे मार्गे धावणार्‍या पाच गाड्या पयायी मार्गे वळण्यात आल्या आहेत. याशिवाय दि. 23 ऑगस्ट रोजी सुटणारी तिरुअंनतपुरम – लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस (16346)   या गाडीचा प्रवास एर्नाकुलमपर्यंतच संपवण्यात येणार असून एर्नाकुमलम आणि लो. टिळक टर्मिनस दरम्यान ती अंशत: रद्द करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here