शृंगारतळी : गुहागर शहराचा एकमेव दुवा असणारा गुहागर-चिपळूण मार्गावरील मोडकाघर येथील पूल गेले अनेक दिवस बंद आहे. त्यामुळे गुहागरचा थेट संपर्क तुटला आहे. गुहागर-विजापूर या प्रस्तावित महामार्गावरचा हा पूल तातडीने व वेगळ्या तंत्रज्ञानाने उभारण्याचे काम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती महामार्गाच्या वरिष्ठ अमोडकाघर येथील धरणावरील पूल हा 0 ते 26 म्हणजेच गुहागर ते रामपूर या प्रस्तावित गुहागर-विजापूर मार्गाचा भाग असून या मार्गावरील अनेक छोटे पूल व मोर्यांची या अंतर्गत नव्याने उभारणी होणार आहे. मात्र, मोडकाघर येथील पुलाला प्राधान्य देण्यात आले आहे. पाण्यामध्ये उभारल्या जाणार्या पुलांच्या अद्ययावत तंत्रज्ञानानुसार या पुलाची उभारणी होणार आहे. या पुलाचे डिझाईनही तयार झाले आहे. मूळचा आठ मीटर लांबीचा हा पूल महामार्गाच्या आराखड्यानुसार बनविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग अधिकार्यांनी दिली. या पुलाच्या कंत्राटाची निविदा प्रक्रियाही सुरु असून अगदी कमी कालावधीमध्ये हा पूल पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे आमचे उच्चस्तरीय प्रयत्न सुरु आहेत अशीही माहिती या अधिकार्यांनी दिली आहे. दरम्यान, मोडकाआगर जवळ व शृंगारतळी पालपेणे फाट्याजवळ मोठे फलक लावून व अडथळे घालून हा मार्ग बंद असल्याचे व लोकांनी पालपेणे मार्गे रानवी गुहागर असा प्रवास करावा असा प्रयत्न प्रशासनाने केला होता. त्यामुळे या पुलावरुन फक्त दुचाकी गाड्या जात होत्या. मात्र, तालुक्यातील शासकीय अधिकार्यांच्या चारचाकी गाड्यांसह सर्रास सर्वच वाहने आता या पुलावरुन जात असल्याचे समोर आले आहे. फक्त राज्य परिवहन आगाराच्या बसेस या आदेशाचे पालन करीत असल्याचे उघड झाले आहे.
